विभाग नियंत्रक कैलास पाटील यांचे सेवानिवृत्त कार्यकारिणी कडुन स्वागत

पालघर विभागातुन नुकताच ठाणे विभागाचा विभाग नियंत्रक म्हणुन पदभार स्वीकारणारे कैलास पाटील यांची राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या ठाणे विभागीय कार्यकारिणी पदाधिकार्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी सेवानिवृत्त संघटनेचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे, विभागाचे अध्यक्ष शामराव भोईर, खजिनदार गणेश पाटील, सदस्य दशरथ विशे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सागर पळसुले देसाई यांची मुंबई विभागात बदली झाल्यामुळे महामंडळाकडुन त्यांच्या जागी कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणुन कैलास पाटील परिचित आहेत.

सेवानिवृत्तांचे जे काही प्रलंबित प्रश्न ठाणे विभागात असतील ते सोडविण्याची आपली प्राथमिकता असेल, ठाण्यातील सेवानिवृत्त कार्यकारिणीला वेळोवेळी सहकार्य असेल असे आश्वासन विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी भेटी दरम्यान आवर्जुन उपस्थित असलेले सेवानिवृत्तांचे राज्य सरचिटणिस सदानंद विचारे यांना संवाद साधताना दिले.

Scroll to Top