संपूर्ण भारतामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन होत असताना घर घर तिरंगा मुरबाड शहरामध्ये भव्य अशा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किसन कथोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅली निघाली.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास नगरपंचायत नगराध्यक्ष मोहन गडगे यांनी पुष्पहार अर्पण करत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेली. आमदार किसन कथोरे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष दादा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले व रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये असंख्य विद्यार्थी, नागरिक, शिक्षक वर्ग, समाजसेवक उपस्थित होते. या रॅलीत कल्याण भाजपा पुर्व व पश्चिम मंडळाचे अध्यक्ष दिपक पवार, जितेंद्र भावार्थे, कल्याण ग्रामीण भाजपा अध्यक्ष शेखर लोणे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रविंद्र घोडविंदे, नगराध्यक्ष मोहन गडगे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,उपनगराध्यक्षा नम्रता तेलवणे, टि. डी. सी. बँकेचे संचालक सौरभ पवार, रामभाऊ दळवी, भाई तेलवणे, माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, युवा नेते अनिल घरत, माजी चेअरमन प्रकाश पवार, मोहन भावार्थे, जयवंत कराळे, एकनाथ पोगेरे, आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, युवा नेता अभिजित खडकबाण, अशोक मोरे, अतुल देशमुख, सागर चंबावणे, दिलीप देशमुख, समाज सेवक विनायक- राव अधिकारी मुरबाड नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, मधुरा सासे, छायाताई चौधरी, नगरसेविका स्नेहा चंबावणे, उर्मिला ठाकरे, स्वरा चौधरी, रेश्मा घरत, सुषमा पडवल, ज्योती गोडांबे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


