मॉडेल शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण पूर्वेतील ‘द ईस्ट कल्याण वेल्फेअर’ संचलित ‘मॉडेल इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयामध्ये’ स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

संस्थेचे सदस्य महेश गायकवाड यांच्या हस्ते हायस्कूलच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यापाठोपाठ मॉडेल महाविद्यालयामध्येही ध्वजारोहण पार पडले, ज्याचा मान संस्थेचे सहसचिव निलेश शिंदे यांना मिळाला. या सोहळ्याला संस्थेचे अनेक प्रतिष्ठित पदाधिकारी व मार्गदर्शक आवर्जून उपस्थित होते. प्रामुख्याने संस्थेचे आधारस्तंभव मार्गदर्शक भगवान भोईर, अध्यक्ष बीजी उन्नीथन, उपाध्यक्ष कैलास सुर्वे, खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी, सभासद दत्ता गायकवाड, जगदीश नायर, सुधाकर जोशी, के. एस. पिल्ले, एम. एम. उपकारे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, उपमुख्याध्यापिका ममता भट्टाचार्य, इन्चार्ज संगीता तांबोळी, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. शिरीन थॉमस गोन्सालविझ, उपमुख्याध्यापक राजाराम कदम आणि माध्यमिक विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक कल्याणी आढारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top