शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीतील रिलायन्स शाखेत भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराचे ५ वे वर्ष असून या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. दरवर्षी शिवसेना उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
सदर रक्तदान शिबिराला स्थानिक कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित राहून रक्तदान ही केले. तसेच या सामाजिक कार्यक्रमाचे कौतुक केले. रिलायन्स टॉवर शिवसेना शाखा येथे आयोजित महारक्तदान शिबिरात १९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘थेंब थेंब रक्ताचा, उपक्रम समाजसेवेचा’ या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या शिबिरासाठी ब्लड लाईन, चॅरिटेबल ब्लड बँक, ठाणे यांचे व हरदेव हॉस्पिटल, दिवा यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी शिबिराचे आयोजक कैलास पाटील, प्रदीप पाटील (शाखाप्रमुख), राहुल जयस्वाल, सुरेश जगताप, भरत मोहिते, जगदीश कदम, संतोष तांबे, मनोहर सकपाळ, अमोल रेडेकर, आदित्य कदम, रुपेश लाड, अनिल विश्वकर्मा, सुदेश चव्हाण, उमेश पवार, सुरज पगारे, आशिष सिंग, हिरामण कदम, रुपेश लाड, एकनाथ जाधव, मारुती जाधव सहदेव काटे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


