ठाणे जिल्ह्यात मानव-श्वान संघर्ष रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात वाढत्या मानव-श्वान संघर्षाच्या घटनांना आळा घालण्यासाठी, भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या नियमावलीनुसार अत्यंत कठोर पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ज्योती परदेशी, विविध महानगरपालिकांचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्र सरकारच्या ‘प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023’ अन्वये जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (ABCशस्त्रक्रिया) आणि रेबीज लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण व शहरी भागात यासाठी आवश्यक केंद्र सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात भटक्या प्राण्यांना हुलकावणी मिळू नये म्हणून तात्पुरते निवारे (Shelters), स्वच्छपिण्याचे पाणी आणि तातडीने आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Scroll to Top