नवी मुंबई महापालिकेच्या मंगळागौर स्पर्धेत ३२ महिला समुहांचा उत्साही सहभाग

नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांकरिता नियोजित महिला मेळाव्याच्या निमित्त मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाव नोंदणी करून सहभागी ३२ महिला समुहांची मंगळागौर स्पर्धेची प्राथमिक फेरी आज सेक्टर ३ वाशी येथील महात्मा फुले स्मृती भवन याठिकाणी संपन्न झाली.

सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार आणि नगरसेविका शशिकला पाटील, समाजविकास उपआयुक्त प्रकाश कांबळे यांनी आवर्जून भेट देत महिला समुहांना प्रोत्साहित केले.

मंगळागौर महिला समुहामध्ये किमान १० आणि कमाल १५ महिला सदस्यांचा सहभाग होता. स्पर्धेच्या नियमानुसार कमीत कमी ८ ते जास्तीत जास्त १० मिनिटांमध्ये समुहांनी बहारदार मंगळागौर सादरीकरण केले. या स्पर्धेच्या माध्यमातून महिला समुहांनी सादरीकरणामध्ये मंगळागौरीची पारंपारिक संस्कृती, लोकनृत्य व पारंपारिक खेळांचे दर्शन घडवले. या सादरीकरणामध्ये पारंपरिकता आणि नाविन्य यांचा सुंदर समतोल अनुभवण्यास मिळाला.

Scroll to Top