ऑगस्ट महिन्याच्या दुसन्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या व सभागृह नेते सागर नाईक यांनी सभागृहापुढे मान्यतेसाठी सादर केलेल्या विविध नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांना पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी मिळाली.
यामध्ये से. 21 नेरुळ येथील शंकराचार्य उद्यानाच्या मागे असलेल्या रिंग रोड व रेडीयल रोड यावर मोठया प्रमाणात रहदारी असते. या ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचून रस्ता खराब होत असल्याने सदर रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे कामास मान्यता देण्यात आली.
नेरुळ विभागात सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारितील दगड खाणीच्या जागेवर कतलखान्याकरिता भूखंड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सर्वांच न्यायालयाच्या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड बनविणे प्रस्तावित आहे. सदर भूखंडाचा भाग डोंगराळ असल्याने भूखंडापर्यंत पोहचण्याकरिता आवश्यक भूभराव करुन व डब्लूबीएमने पोच रस्ता तयार करणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या कामास सर्वसाधारण सभेची मंजूरी प्राप्त झाली तुर्भे टिटिसी एमआयडीसी क्षेत्रात विविध संस्थांमार्फत सेवा पुरविण्यासाठी परवानगी घेऊन खोदकाम करण्यात आलेले आहे. परवानगी देताना खोदकाम पूर्ववत करण्याचे शुल्क भरुन घेण्यात आलेले आहे. सदर खोदलेल्या चरांचे डांबरीकरणाने पुनर्पूष्ठीकरण करुन रस्ते सुधारणा करण्याच्या कामास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
अशाच प्रकारे सानपाडा से 14 येथील शंकर टॉवर ते पोलीस स्टेशनपर्यंत असलेले हेवी ड्युटी पावसाळी गटार नादुरुस्त होऊन मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे तेथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच या भागातील रस्त्यांवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गाड्यांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यानुसार सत्याची रुंदी वाढवून पार्किंग समस्या दूर करण्याच्या दृष्टीने या हेवी ड्युटी पावसाळी गटाराची पुनर्बाधणी करण्याच्या कामास मंजूरी प्राप्त झाली.
सानपाडा से 14 व 15 येथील गोरबंध सोसायटी ते कोयना सोसायटी पर्यंत सध्या अस्तित्वात असलेले ड्रेनेज मोडकळीस आल्याने सांडपाणी साचून राहते. यामुळे नागरिकांना होणारा दुर्गंधी व अनारोग्याचा त्रास दूर करण्यासाठी या ठिकाणी हेवी ड्युटी एस. डब्ल्यू ड्रेन बांधण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.
करावे येथील बाळशेठ तांडेल उद्यान लगतच्या साई वाडी परिसरातील पावसाळी गटार हे उद्यान पातळीच्या साधारणतः ०.९० मीटर खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे मोठ्या पावसात या परिसरात नागरिकांच्या बैठ्या घरामध्ये पाणी शिस्ते. या अनुषंगाने करावे साई वाडी परिसरातील पाण्याचा निचरा योग्य रितीने होण्याकरिता याठिकाणी आरसीसी गटार बांधणे कामास सर्वानुमते मंजूरी प्राप्त झालेली आहे.


