ठाण्यात रित्वाचे नवे ज्वेलरी स्टोअर सुरू

ठाण्यात रित्वाचे नवे ज्वेलरी स्टोअर सुरू

भारतीय कलात्मकता आणि आधुनिक डिझाइनचा सुरेख संगम असलेल्या ज्वेलरी ब्रँड रित्वाने ठाण्यातील गोखले रोडवर आपले नवीन स्टोअर सुरू केले आहे.
सुमारे ४०० चौरस फुटांमध्ये उभारण्यात आलेल्या या स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री अमृता राव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अभिनेत्री किशोरी शहाणे अंकिता प्रभु वालावलकर, अभिनेता राहुल रॉय आणि शिव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. स्टोअरमध्ये पारंपरिक, सण-समारंभांसाठी तसेच आधुनिक आणि दैनंदिन वापरासाठी विविध प्रकारचे ज्वेलरी कलेक्शन उपलब्ध आहे. रित्वाचे विशेष स्मार्टगोल्ड तंत्रज्ञान आणि ५०४ थिक गोल्ड-प्लेटेड फिनिशमुळे दागिन्यांना आकर्षक सोन्यासारखा लूक मिळत असून ते टिकाऊ आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असल्याचा बँडचा दावा आहे.
ठाण्यातील हे नवे स्टोअर रित्वाच्या महाराष्ट्रातील आणि देशातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमधील विस्ताराच्या योजनांचा एक महत्त्वाचा भाग असून, भारतीय परंपरा, उत्कृष्ट कारागिरी आणि आधुनिक डिझाइन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे.

Scroll to Top