शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर परिवाराच्यावतीने दरवर्षी एका मंदिराचा जिर्णोद्धार केला जातो. त्याच धर्तीवर गेल्या काही वर्षांपासून ज्यांना कोणाचा आधार नाही जे गोरगरीब आर्थिक संकटात येऊन पडलेलं घर उभा करू शकत नाहीत अशा घराला वाळेकर परिवाराच्या वतीने मानवतेचे घर उभारून देण्याच्या यथाशक्ती प्रयत्नातून रविवारी पश्चिमेकडील मारवाड़ी गल्लीत राहणाऱ्या वयोवृद्ध अंबिका श्रीनिवास अनुपे यांच्या पडलेल्या घराला ‘मानवतेचे घर बांधून देण्याचे भूमिपूजन स्थानिक नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अंबरनाथ पश्चिमेकडील इंदिरा गार्डन, गोसावी चाळ जवळ, मारवाडी गल्ली येथे अंबिका श्रीनिवास अनुपे या दोन मुली, बहिण आणि वयोवृद्ध आईसह हलक्याच्या परिस्थितीत राहते. धुणी-भांडीचे काम करून उदरनिर्वाह करतात. अगदी छोट्याशा पडझडीला आलेल्या घरात पावसाळ्यात अक्षरशः घमेल, बालदी लावून ठिगळं काही थांबेना, अशा असह्य परिस्थितीत कोणाचाही आधार नसलेला पडक्या घराला थोडंसं पुढे वाढवून, थोडी उंची वाढवून, टॉयलेट, किचनसह ‘मानवतेचे घर’ उभारून देण्याचा प्रयत्न वाळेकर कुटुंबाने केला आहे. हे १४ वे ‘मानवतेचे घर ‘असल्याचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी सांगितले. याप्रसंगी अंबिका श्रीनिवास अनुपे यांनी माझ्या गरीब परिस्थितीत पडलेले घर बांधू नाही शकत. माझ्या असहा परिस्थितीत एक प्रकारे देवाच्या स्वरूपात वाळेकर परिवार धावून आला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अंबरनाथमधील अण्णा वाळेकर परिवाराच्या संकल्पनेतून १४ वं ‘मानवतेचे घर’



