येथील मोहिली-अघई आत्मा मालिक या शैक्षणिक व क्रीडा संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व सेवा संकल्प अभियान उत्साहात साजरा करण्यात आला.
आत्मा मालिक यांच्या कृपाशीर्वादाने व समस्त संतपीठ यांच्या प्रेरणेने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे, विचारप्रदर्शन व देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. तर सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव या महात्मा गांधी यांच्या विचारांचे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचारण करावे असा संदेश देण्यात आला.
त्याचबरोबर, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसह शिक्षक – शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेत संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तर ‘सेवा हिच साधना’ या भावनेतून सेवा संकल्प अभियान अंतर्गत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी, गरजू व्यक्तींना मदत करण्याची भावना व राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव, उपाध्यक्ष प्रकाश भट, सचिव अनंत गायकवाड, सदस्य प्रवीण मोरे आदी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे शालेय व्यवस्थापक ब्रिज भारद्वाज, व्यवस्थापक (सामान्य प्रशासन) उल्हास पाटील, वसतिगृह व्यवस्थापक संतोष मेंढे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य कैलास थोरात, इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्या पौर्णिमा उपासनी, आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड टेक्नॉलॉजी प्राचार्या आरती करांडे व शिक्षक-शिक्षिकेतर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात महात्मा गांधी जयंती व सेवा संकल्प अभियान



