कल्याण पूर्वेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे देशातील पहिले भव्य स्मारक

आणि त्या काळातील नौदल सामर्थ्य यांची माहिती देणारे एक अभ्यासपूर्ण स्मारक उभारण्याचा प्रयत्न आहे. आरमारातील विविध जहाजांच्या भव्य प्रतिकृती उभारून त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाची माहिती नागरिकांना अनुभवता यावी, अशी संकल्पना आहे. या स्मारकासाठी योग्य जागा, उपलब्ध क्षेत्रफळ, परिसराचा विकास, स्मारकाची रचना आणि आवश्यक सुविधांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार प्रस्तावित या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची आणि दूरदृष्टीची साक्ष देणारे देशातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक कल्याण पूर्वेतील कचोरे-नेतीवली टेकडी परिसरात उभारण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक अभ्यास आणि नियोजन करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी आणि महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित होते. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराचा गौरवशाली इतिहास नागरिकांना आणि विशेषतः नव्या पिढीला समजावा, यासाठी आरमाराशी संबंधित सविस्तर माहिती तसेच उत्तम आणि वास्तवदर्शी प्रतिकृती उभारण्याची संकल्पना आहे. यासोबतच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे. कचोरे नेतीवली टेकडी परिसरातील उपलब्ध जागेचा स्मारकासाठी योग्यतेच्या दृष्टीने अभ्यास करणे, स्मारकाची संकल्पना, स्वरूप आणि आवश्यक बाबी निश्चित करणे तसेच त्यासाठी पुढील नियोजन करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार हे त्यांच्या सागरी दूरदृष्टीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे प्रस्तावित स्मारक केवळ पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता आरमाराची निर्मिती, त्याची रचना, जहाजांचे प्रकार, सागरी मोहिमा आणि त्या काळातील नौदल सामर्थ्य यांची माहिती देणारे एक अभ्यासपूर्ण स्मारक उभारण्याचा प्रयत्न आहे. आरमारातील विविध जहाजांच्या भव्य प्रतिकृती उभारून त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाची माहिती नागरिकांना अनुभवता यावी, अशी संकल्पना आहे.
या स्मारकासाठी योग्य जागा, उपलब्ध क्षेत्रफळ, परिसराचा विकास, स्मारकाची रचना आणि आवश्यक सुविधांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार प्रस्तावित या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Scroll to Top