नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात
कंटेनर पलटी झाला असता कंटेनरखाली सापडून एका दामपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेदाची बाब अशी की अपघातग्रस्त कंटेनरखाली दुचाकी सापडली असल्याची माहिती कोणाला नव्हती. कटेनर बाजूला करतेवेळी ही बाब स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांच्या लक्षात आली.
शुक्रवारी सकाळी नाशिक हुन मुंबई कडे निघालेला कटेनर क्रमांक एन एल ०१ एन ०६८८ हा भरधाव वेगात जात असताना सकाळी अकरा वाजता नवीन कसारा घाटातील नागमोडी वळण कापत असताना चालकाचा गाडी वरील ताबा सुटला व कटेनर जागीच पलटी झाला. परंतु या कटेनरच्या मागोमाग दुचाकी असल्याचे कोणासही माहिती नव्हते. त्यामुळे कंटेनर पलटी झाल्याची व कोणालाही दुखापत नसल्याची नोंद कसारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान दुसऱ्या दिवशी अपघातग्रस्त कंटेनर काढण्यासाठी कंटेनर खाली करण्याचे काम सुरु करण्यात आले त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य लक्ष्मण वाघ, जसविंदर सिंग, दत्ता वाताडे, बाळू मांगे हे क्रेन सह घटनास्थळी गेले असता कटेनर खाली केल्यावर उग्र वास येऊ लागल्याने टीम सदस्य लक्ष्मण वाघ व जसविंदर भाई व बाळूमांगे यांना संशय आल्याने त्यांनी टीमचे शाम धुमाळ यांना संपर्क केला व त्यांना सदर प्रकार सांगितला. या दुर्दैवी अपघाताची माहिती तात्काळ कसारा पोलीस ठाण्यास दिली. या दुर्दैवी अपघातची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा, महामार्ग पोलीस घोटी केंद्र व कसारा पोलीस यांनी क्रेन च्या मदतीने कटेनर बाजूला करून दबलेले दुचाकी व मृतदेह बाहेर कडून सदर पती पत्नी चे मृतदेह रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. जालिंदर भगत व अनुसया भगत असे या पती पत्नीचे नाव असून ते घोटी येथील राहणारे असल्याचे समजते. दरम्यान या प्रकारणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी निखिल लसने, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस हवालदार उमेश चौधरी, पोलीस हवालदार देवेंद्र शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान घोटी हुन कसारा साठी निघालेले हे भगत दाम्पत्य कसारा येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी निघाले होते पण ते कार्यक्रमात पोहचले नसल्याने घरच्या लोकांनी रात्री शोधा शोध सुरु केली. परंतु काही केल्या त्यांचे लोकेशन लागत नव्हते आज सकाळी जेव्हा ही बातमी कळली तेव्हा नातेवाईकांनी कसारा घाटात धाव घेतली व सदर मृतदेह हे जालीदर भगत व त्याच्या पत्नी चे असल्याचे निष्पन्न झाले.
कंटेनर अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू



