मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना सुपुर्द करण्यात आला.
बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनेचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली. दुष्काळग्रस्तांना मदतीचा चेक हस्तांतरित करण्यासोबतच रा.प. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे आणि पेन्शन विषयक विविध समस्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
एस.टी च्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत



