महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते विविध नागरी सुविधा कामांचा शुभारंभ

nn

प्रभागक्र. २३ मधील नागरिकांनी निवडणूकीत अत्यंत विश्वासाने विजयी केले त्या प्रभागात विविध नागरी सुविधांचा महापौर म्हणून
शुभारंभ करीत असताना येथील नगरसेविका म्हणून नागरिकांनी जो विश्वास दाखविला त्याला सार्थ ठरविण्याच्या दिशेने टाकलेले हे
पहिले पाऊल असल्याचे मत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. ही कामे जरी छोटी असली तरी प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत यापूर्वीही उपलब्ध करून देण्यात आलेली सेक्टर ८ भागात सीसीटिव्ही सारखी महिलांना सुरक्षित व भयमुक्त वाटावे अशी सुविधा किंवा सेक्टर ८ येथील शौचालयासारखी सुविधा ही महिला भगिनींचा सन्मान करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २३ नेरूळ येथील विविध नागरी सुविधा कामांच्या शुभारंभप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांच्या समवेत क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे, स्थानिक नगरसेवक सुरज पाटील, कार्यकारी अभियंता उमेश पाटील, कार्यकारी अभियंता दिपक सूर्यराव आणि इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यास या कामांव्दारे सुरूवात होत असल्याचे समाधान वाटते अशी भावना व्यक्त करीत ही कामे गुणात्मक दर्जा राखून विहित वेळेत पूर्ण होतील याकडे बारकाईने लक्ष देण्यात येईल असे स्पष्ट केले व तशा सूचना उपस्थित अभियंतावर्गास दिल्या. जनतेशी असलेली बांधिलकी कायम राखून सुविधा कामात सातत्य ठेवण्यात येईल असाही विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top