श्रीनिवास गुंडारी हायबीझ टीव्ही मिडिया पुरस्काराने सन्मानित

मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय सेवांसाठी हायबीझ टीव्ही मिडिया अॅवार्ड २०२६ हा पुरस्कार महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स चे अध्यक्ष तसेच साक्षी मुंबई ब्युरो इंचार्ज श्रीनिवास गुंडारी यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवारी तेलंगणा राज्याचे आयटी, उद्योग व वाणिज्य मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्या हस्ते हैदराबाद येथील हायटेक सिटीमधील सायबर गार्डन्स कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.


या कार्यक्रमाला अनिल कुमार यादव, विवेक गुप्ता तसेच हायबीझ टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक माडिशेट्टी राजगोपाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान श्रीनिवास गुंडारी यांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे आणि शुभेच्छुकांचे सततच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. आपल्या पत्रकारिता प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top