भिवंडी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच पडघा परिसरातील विविध शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यमातील आर. के. पालवी इंग्रजी शाळा आणि टी.ए. पाटील इंग्रजी शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे. तर मराठी माध्यमातील शारदा विद्यालयाने ८७.०१ टक्के निकाल मिळवत यशाची नोंद केली आहे.
पडघा परिसरातील मराठी माध्यमाच्या शारदा विद्यालयात यावर्षी २०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ८७.०१ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शिक्षक, पालक आणि व्यवस्थापनामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या विद्यालयात पूर्वा माळी हिने २१.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तन्मय थोरात याने २०.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर वेदांत शेलार याने २०.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आर. के. पालवी इंग्रजी शाळेने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत १०० टक्के निकाल नोंदविला. शाळेतील रुद्र अविनाश पाटील याने २६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. मंथन राजेश पाटील याने ९५.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर पूर्वा किशोर रोकडे हिने ९५ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविल्याची भावना शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली. शिक्षणाबाबतची निष्ठा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पालवी यांचे मोलाचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे – भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये – आर.के. पालवी इंग्रजी शाळेने गुणवत्तेच्या बाबतीत – अव्वल स्थान मिळविल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान, पडघ्यातील टी.ए. पाटील इंग्रजी शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील – स्नेहा श्याम नवलखेरे हिने २२.६० टक्के गुण मिळवत – प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री शशिकांत भोईर हिने – ९२.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
तर गीता चोपाराम चौधरी आणि श्रेयश आनंदराव मोरे यांनी प्रत्येकी २०.६० टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या – तृतीय क्रमांक मिळविला. तसेच बी.बी. पाटील कुरुंद इंग्रजी शाळेचा निकाल २६ टक्के लागला असून – गिरिश्मा रवींद्र जाधव हिने ८८ टक्के गुण मिळवत – शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्रामीण विकास – संस्थेचे आदर्श विद्यालय कुरुंद या माध्यमिक शाळेचा -९४.८०% लागला असून भूमिका परेश विशे- ९१.४०% प्रथम क्रमांक, सृष्टी शरद घरत २१.२०% दुसरा – क्रमांक, धनश्री मगन विशे ८७% तृतीय क्रमांक मिळवला आहे. पडघा परिसरातील विविध शाळांनी – मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे – वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर – अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


