महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोन सराईत महिला चोरांना अटक

कळव्यातील पारसिक नगर येथील अंजनी सूर्यवंशी या खारेगाव वरून ओझान व्हॅली पारसिक नगर बसने प्रवास करीत असताना बसमध्ये उभ्या असताना तिच्या आजुबाजूला असलेल्या तीन महिलांनी आपापसात संगनमत करून त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून १४ तोळे सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी करून तेथून पोबारा केला होता. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली होती. या संदर्भात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

त्या अनुषंगाने तपास सुरू असताना कळवा पोलीस ठाण्यात वारंवार असे गुन्हे घडत होते. गुन्हे शाखा पोलिस हवालदार संदीप महाडिक व प्रशांत लवटे यांनी महिला चोरांची माहिती काढली असता आरोपी १) संगीता पिठकर (वय ४५) वडार पाडा मुलुंड, २) सुरेखा गायकवाड (वय ४७) गव्हाण पाडा, मुलुंड यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ३७ लाख १९ हजार किमतीचे २५ तोळे सोने त्यांच्याकडून हस्तगत केले. या आधीही महिलांवर कळवा, राबोडी, ठाणे नगर, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top