स्पोटिंग क्लब कमिटीच्या विविध स्पर्धांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

मर्यादित षटकांचे सामने आयोजित करणाऱ्या स्पोटिंग क्लब कमिटीने भविष्यात दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यातही पुढाकार घ्यावा असे आवाहन मुंबई क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कॉन्सिलचे सदस्य संदीप विचारे यांनी केले आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या विविध स्पर्धाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात संदीप विचारे बोलत होते. यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे अपेक्स कॉन्सिलचे सदस्य प्रमोद यादव, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, उपाध्यक्ष अॅड कैलास देवल, सचिव आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अपेक्स कॉन्सिल सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, खजिनदार जितेंद्र मेहता व्यासपीठावर उपस्थित होते. स्पोटिंग क्लब कमिटीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध स्पर्धाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या जोडीने संस्थेचे सचिव, नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले यांनी दिलेले दोन कुलर्स, महिला क्रिकेटपटूंसाठी तयार करण्यात आलेल्या अद्ययावत चेंजिंग रूम, क्रिकेटपटूसाठी मोबाईल टॉयलेटस यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी, सर्वश्री संदिप विचारे आणि प्रमोद यादव यांनी क्रिकेटच्या विकासाकरिता मुंबई क्रिकेट संघटनेकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे सचिव विकास रेपाळे म्हणाले, संस्थेच्या नविन समितीने पदभार स्वीकारल्यापासून मैदानावर क्रिकेटपटूंना सर्वोत्तम सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. नविन चेंजिग रम, मोबाईल टॉयलेटस हा त्याच सुविधांचा एक भाग आहे. यापुढच्या काळातही क्रिकेटपटूंसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top