संगमेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मोठी चालना

१ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी

मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत संगम येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र संगमेश्वर या ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाच्या विकासाला राज्य शासनाने मोठी चालना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत संगमेश्वर मंदिर परिसरातील महत्वपूर्ण विकासकामांसाठी १ कोटी २९ लाख ९४ हजार ३०० रुपयांची प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिली आहे.

याबाबत ग्रामविकास विभागाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला असून, शासन निर्णय क्रमांक तीर्थवि-२०२६/३-१७६१८१७/योजना-११ असा आहे. या निर्णयामुळे संगमेश्वर तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र संगमेश्वर येथे मंदिराच्या सभामंडपासाठी दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी १ कोटी २९ लाख २४ हजार रुपयांची अंदाजपत्रकीय तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात येणान्या भाविकांना अधिक सुरक्षित व प्रशस्त सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकान्यांनी १७ जून २०२६ रोजी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली १८ जून २०२६ रोजी राज्य निकष समितीची बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावातील विकासकामे, अंदाजपत्रके आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून निधी देण्याची शिफारस करण्यात आली. या शिफारशीच्या आधारे आता राज्य शासनाने विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Scroll to Top