सेवा संकल्प अभियाना अंतर्गत बदलापूर मध्ये ४१३ नवीन वीज जोडणी

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत बदलापूर मध्ये ४१३ नवीन वीज जोडणी

महावितरण कडून राबविण्यात येत असलेल्या सेवा सेतू आणि सेवा संकल्प अभियानाने आता गती पकडली आहे. महावितरणच्या बदलापूर विभागात मागील दोन आठवड्यात ४१३ नवीन वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात आला आहे.
महावितरणच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बदलापूर विभागात स्टॉल लावण्यात आला आहे. आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड परिसरातील स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी सोबत मुरबाड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, संतोष पवार, कनिष्ठ अभियंता सचिन धनावडे उपस्थित होते. वीज ग्राहकांचे समाधान करण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले.
मागील पंधरवड्यात बदलापूर पूर्व उपविभागातील २०७ तर पश्चिम उपविभागात १८१ वीज ग्राहकांच्या वीज देयकाची दुरुस्ती करून देण्यात आली आहे. स्मार्ट मीटर संदर्भात एकुण १२९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पूर्व उपविभागातील ६२ तर पश्चिम उपविभागात ३९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुर्य घर योजनेसाठी १९ वीज ग्राहकांनी उत्सुकता दाखवली आहे. महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ येथील शासकीय कार्यालयात स्टॉल लावण्यात आला आहे. वीज ग्राहकांनी या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता विजय फुंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, राजेंद्र भांबर, हरीष भराडे यांनी केले आहे.

Scroll to Top