मुंबई विभागाने पटकावले सांघिक विजेतेपद
कल्याण – मागील चार वर्षापासून गतका खेळाच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धा होत होत्या. या वर्षी महाराष्ट्र राज्यात देखील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निश्चित करण्यात येणाऱ्या शालेय स्पर्धा यादीमध्ये गतका खेळाचा समावेश करण्यात आला आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे आणि असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम राज्यस्तरीय शालेय गतका क्रीडा स्पर्धेचे आयोजन कल्याण मधील अचीवर्स कॉलेजमध्ये नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ विभागांपैकी पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, मुंबई या विभागातील जवळ जवळ ११० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धे प्रसंगी असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्र अध्यक्ष संतोष चौधरी, सचिव प्रा. आरती चौधरी आणि अध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त मोर्चा माजी आमदार नरेंद्र पवार, डॉ. महेश भिवंडीकर आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर यांनी मुलांचे प्रोत्साहन वाढवले.या स्पर्धेमध्ये प्रथम सांघिक विजेतेपद मुंबई विभाग, द्वितीय पुणे विभाग आणि तृतीय अमरावती विभाग यांनी पटकावले.


