टीडीसी बँकेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन’च्या उमेदवारांचा प्रचार

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मर्यादित बँकेची निवडणूक पार पडत असून या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनलची’ प्रतिष्ठा एष्णाला लागली आहे. त्यामुळे या होत असलेल्या निवडणुकीत उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रचारात रणशिंग फुंकले आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकरी, शिक्षक वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना सोईस्कर ठरणारी सहकारी बँक म्हणून दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ओळखळी जाते. या बँकेच्या विविध प्रवर्गाच्या संचालक मंडळ पदासाठी सन 2026-031 हि पंचवार्षिक निवडणूक शनिवार दि. 27 जून रोजी पार पडत आहे. यामध्ये एकूण 21 संचालक मंडळाची समिती आहे. यामध्ये 10 संचालकांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 11 संचालक जागांसाठी निवडणूक पार पडत आहे.

या पार पडत असलेल्या निवडणूकीत महायुती पुरस्कृत ‘परिवर्तन पॅनल’ तयार करण्यात आले असून यामध्ये या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार लढत देत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल माध्यमातून हि निवडणूक लढविली जात आहे. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रातील या होणाऱ्या निवडणुकीत विविध बैठका, प्रचार दौरे पार पडत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार व कार्यकर्ते, पदाधिकारी हे ठाणे-पालघर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात असलेल्या मतदारां पर्यंत पोहचून भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक व पगारदार या सभासद – ग्राहकांना विविध सुविधा व लाभदेण्याच्या दृष्टीने या उमेदवारांकडून आश्वासित केले जात आहे. दरम्यान, मतदानासाठी अवघा आठवडा राहिला असून यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रितपणे जोमाने प्रचार कामाला लागले आहेत. त्यामुळे परिवर्तन पॅनलची प्रचारामध्ये आघाडी असल्याचे बोलले जाते.

Scroll to Top