टोरेंट पॉवर आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी भिवंडीतील चाविंद्रा येथील अर्श ग्राहक
सेवा केंद्रात एका विशेष ग्राहक सेवा शिबिराचे आयोजन केले होते. या ग्राहक सेवा शिबिराला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व शिबिरात ५०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. महावितरणकडील जुन्या प्रलंबित थकबाकीशी संबंधित मुख्य प्रश्न उपस्थित केले गेले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अंशतः भरणा करण्याचे पर्याय उपलब्ध करून मदत वीज बिल आणि वीज चोरीशी संबंधित समस्यांबाबत ग्राहकांना मार्गदर्शन व सहकार्य केले आणि डिजिटल पेमेंट सेवा, वीज सुरक्षा, ऊर्जा संवर्धन टिप्स, वीज चोरीबद्दल जागरूकता यासारख्या विषयांवर ग्राहकांमध्ये जागरूकता केली. या विशेष ग्राहक सेवा शिबिराला टोरेंट पॉवरचे महाव्यवस्थापक अंकित साहा, राघवेंद्र राव, विजय राणे, प्रशांत कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिबिरास ग्राहकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.केली. टोरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी


