महापौर सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

नवी मुंबई महापालिका निवडणुकांनंतर महापालिका सर्वसाधारण सभांना सुरूवात झाली असून या सभांमध्ये मंजूर
झालेल्या विविध ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठक आयोजित करीत घेतला. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, सुरज पाटील, दत्तात्रय घरत, अंजनी भोईर, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील तसेच अति. आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्वीजय चव्हाण आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी झाल्यापासून दरमहा होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध नागरी सुविधा कामांचे, नागरी प्रश्नांच्या सोडवणूकीचे, आर्थिक नियोजनाचे ठराव मंजूर झालेले आहेत. या ठरावांवर महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेली कार्यवाही व त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विभागनिहाय प्रत्येक ठरावावरील कार्यवाहीची माहिती घेण्यात आली. या सर्व ठरावांवर विस्तृत चर्चा होऊन प्राधान्याने आरोग्य, शिक्षण विषयक ठरावांवर जलद कार्यवाही करण्याचे तसेच इतर ठरावांच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी प्रशासनास दिले.

Scroll to Top