पवनकुमार काजू महतो, (३३) रा. बिहार असे हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव असून रमीज अब्दुल रशीद अन्सारी (२३), मोहम्मद अलकैश परवेज आलम मोमीन (२५) दोघे रा. भिवंडी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २.४५ वाजताच्या सुमारास भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर टाटा आमंत्रा येथे ट्रेलर कमांक एम एच ४६ बी यु २११० वरील चालक पवनकुमार महतो ट्रक थांबवून चालक जेवण करीत असताना दोघा आरोपींनी पैसे चोरीच्या उद्देशाने त्याला धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यास प्रतिकार केल्यानंतर दोघा आरोपींनी त्याच्या मानेवर चाकूने वार करीत हत्या करून त्याच्या जवळील पैसे घेऊन दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा कोनगाव पोलिस ठाण्यात दाखल केला होता. पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या कडे तपास सोपवून पाच पथक हत्येचा तपास करण्या करीता बनविण्यात आली. पोलीस पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव चुंबळे, अरुण घोलप, हर्षल ৩
राजपुत, पोलिस उपनिरीक्षक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर गोरे, पोलिस कर्मचारी गोरले, घोडसरे, परदेशी, हाडळ, वाकसे, खडसरे, पाटील, ढाकणे, तुपकर, गोडबोले, शेख, जाधव यांनी गुन्हयाच्या घटनास्थळावर आरोपी शोधण्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही धागेदोरे नसताना, गुन्हयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी सांगितलेल्या वर्णनावरून गुन्हा करणारे मोटार सायकल वरील इसमांचा घटनास्थाळाचे परिसरातील तसेच भिवंडी शहरातील सुमारे १५० सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची सलग तीन दिवस चिकाटीने व बारकाईने पाहणी करून शोध घेत असताना सी.सी.टी. व्ही मध्ये दिसणारे संशयीत आरोपींची ओळख पटवून तांत्रिक पध्दतीने कसोशीने शोध घेवून आरोपी रमीज अब्दुल रशीद अन्सारी, मोहम्मद अलकेश परवेज आलम मोमीन या दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


