‘उडान फेस्ट… स्वप्नांना देऊया भरारी’ या प्रदर्शनाला अंबरनाथकरांनी दिला उदंड प्रतिसाद

अंबरनाथमध्ये गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने भाजपा नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांच्या संकल्पनेतून ‘रक्षाबंधन’ निमित्त महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘उडान फेस्ट… स्वप्नांना देऊया भरारी’ हा महिला सक्षमीकरण उपक्रम अंबरनाथ शहरात दुसऱ्यांदा महात्मा गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.

दोन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यावेळी अंबरनाथकरांनो ‘उडान… फेस्ट’ ला आवर्जून भेट द्या आणि महिला उद्योजिकांच्या कलेला, कौशल्याला व व्यवसायाला प्रोत्साहन देत, खरेदीचा आनंद लुटा असे आवाहन नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले होते. दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या विक्री व प्रदर्शनाला भेट देऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. ‘उडान फेस्ट’ या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील, अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील तसेच सुनिता गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून ‘उडान फेस्ट’ चे उद्घाटन करण्यात आले. महिलांनी आज विविध क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्या कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत हे महिलांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांच्या संकल्पनेतून महिला मोर्चा अध्यक्षा कांचन मिश्रा व पौर्णिमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिला सशक्तिकरणाच्या दिशेने ठोस पाऊल उचलून श्रावण मासातील व्रतवैकल्य आणि सण-उत्सवाच्या पर्वावर रक्षाबंधन निमित्त अंबरनाथ शहरात २२ आणि २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत अंबरनाथ पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये विक्री व व प्रदर्शनाला अंबरनाथ शहर आणि परिसरातील नागरिकांनी भेट देऊन महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले.

Scroll to Top