धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे – जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजसेवा व कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ. अंजली चौधरी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top