अंबरनाथ अटल सूर्योदय उद्यान नागरिकांसाठी खुले
अंबरनाथ पूर्व सूर्योदय सोसायटी परिसरात शिवसेना नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या प्रभागात असलेल्या अटल सूर्योदय उद्यानाचा अत्यंत उत्तम
अंबरनाथ पूर्व सूर्योदय सोसायटी परिसरात शिवसेना नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या प्रभागात असलेल्या अटल सूर्योदय उद्यानाचा अत्यंत उत्तम
भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व समरसता मंचचे दीर्घ काळ कार्याध्यक्ष राहिलेले पद्मश्री भिकू (दादा) इदाते यांच्या इंग्रजी अनुवादित
भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गाव शिक्षण, सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या नव्या आदर्शामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले
शिक्षण ही प्रगतीची मूलभूत गुरुकिल्ली आहे. शिक्षणाशिवाय व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे आदिवासी मुला-मुलींनी शिक्षण घेऊन जीवनात
दिशा चुकलेल्या समाजाला फक्त चांगला शिक्षकच योग्य दिशा दाखवू शकतो. आमच्या शिक्षकांनी फक्त आमचाच विचार केल्यामुळे आम्ही घडू शकलो. नव्या
राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा एकप्रकारे आपणच आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा दिवस असून नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवून कुठेही
शून्य सावली दिवसाचे उत्साहात निरीक्षण आकाश मित्र मंडळ आणि सुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कल्याण येथील सुभाष मैदानावर ‘शून्य
जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असताना, केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी
ठाणे – सुप्रसिद्ध कथालेखिका पूनम कर्णिक यांना सर्वद फाउंडेशनतर्फे नुकतेच ‘सर्वद स्टार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कथालेखिका, गायिका, निवेदिका म्हणून ठाणेकरांना
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची व शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात येते. या अनुषंगाने नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने एनएमएमटी घणसोली आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आलेली आहे. या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झंझाड, माजी खासदार, डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य राजेश राय, यशपाल ओव्होळ, अभिजीत पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर तसेच परिवहन उपकमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक अचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सिताप आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी एनएमएमटी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. परिवहन उपक्रमात अहोरात्र कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महापौर महोदयांनी प्रशंसा केली. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल व कामाच्याच ठिकाणी व्यायामशाळा असल्याने आपल्या व्यस्त कामकाजातून नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल असे त्या म्हणाल्या. कर्मचारीवर्गाच्या आरोग्याकरिता परिवहन उपक्रमाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असल्याचे मत महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.